गडचिरोलीविदर्भ

राईस मिलमुळे देसाईगंज व आजूबाजूच्या परिसरात राख व धुळीची समस्या

श्वसनाचे विकार बळावले ; वस्तीजवळच्या उद्योगांमुळे बळावली समस्या

देसाईगंज : जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून देसाईगंजची ओळख आहे. याशिवाय येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन आहे. आज शहराची चोहोबाजूंनी लोकवस्ती वाढत आहे. अलीकडच्या काळात शहराच्या मध्यभागी, पूर्व दिशेला लाखांदूर रोडच्या मुख्य राज्य महामार्गालगत राईस मिलचा मोठ्या प्रमाणात डोलारा उभा राहिल्याने देसाईगंज व आजूबाजूच्या परिसरात राख व धुळीची समस्या वाढली. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार बळावत आहेत.

देसाईगंज शहरात प्रवेश करताना आमगाव रोड, तुळशी मार्ग, कोकडी मार्ग, आरमोरी मार्ग, जुनी वडसा मार्ग आदी ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ह्या राईस मिलच्या बायलरमधून कोंड्याची जळालेली राख मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकली जात आहे. जराशी हवा सुटली की, ह्या राखेचे कण येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांच्या डोळ्यात जातात, ही वस्तुस्थिती आहे. ही राख नागरिकांच्या डोळ्यात जाऊन अनेकांना अपंगत्वही आलेले आहे. तसेच ही राख हवेच्या झोक्याबरोबर घराच्या छतावर, अंगणात, पाणी साठवून ठेवायचे वॉटर टैंक, दुकानाचे काऊंटर, वाळत घातलेले कपडे यावर जमा होते. त्यामुळे परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना ह्या समस्येशी झुंजावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

धान कोंढ्याच्या डस्टमुळे शहरासह आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यांना या प्रदूषणापासून मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या गंभीर बाबीकडे जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच स्थानिक प्रशासनाने गांभीयनि घेतले नाही तर भावी पिढीत आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होणारच यात शंका नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. रस्त्याच्या कडेला राख आणून टाकणाऱ्या राईल मिलचे मालक निर्वावलेले आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीच सोयरसुतक नसल्याचे त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून दिसून येते. त्यातही मिलर्सकडून दिवसरात्र धानाची भरडाई होत असल्याने त्यांच्या धानकोंढा फेकणाऱ्या भोंग्यातून तसेच भात गिरणीवर लावलेल्या व्हेंटिलेशनच्या पंख्यातून कुकूस धानफोलमिश्रित धुळीकण हवेच्या झोक्यासह परिसरात पसरतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button