गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

रेझिंग डे निमीत्त गडचिरोली पोलीस दलातर्फे पथसंचलन

पथसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

गडचिरोली : ०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जातात. या निमित्ताने आज सकाळी १० वा. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले.

०२ जानेवारी पासून जिल्ह्यातील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोकमें मध्ये रेझींग डे साजरा करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन प्रत्येक शाळेमध्ये शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा रॅली व व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज गडचिरोली शहरातील कारगील चौकापासुन पथसंचलन सुरु होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्थानक येथुन परत इंदिरा गांधी चौक येथे येवून पथसंचलनाची सांगता करण्यात आली. सदर पथसंचलनात पोलीस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतुक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटुन, बँड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटुन, टु व्हिलर वाहन प्लाटुन, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस स्टेशन गडचिरोली, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हीक अॅक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल इ. शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमीक आश्रम शाळा, गडचिरोली, सरस्वती विद्यालय, महिला महाविद्याल तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी असे एकुण २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला.

सदर पथसंचलनामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप, प्रभारी अधिकारी, पोस्टे गडचिरोली रेवचंद सिंगनजुडे व राखीव पोलीस निरिक्षक, गडचिरोली अनुज कुमार मडामे व विविध शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button