भंडारामहाराष्ट्रमुंबईविदर्भ

आता प्रत्येक शाळेत सिक रूम बंधनकारक 

राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षण विभागाचे निर्देश

भंडारा : आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, तसेच शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी फर्स्ट एड किंवा सिक रूम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत.

राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशावेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत शिक्षकांना शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास प्रशिक्षण देण्यात यावे. शाळेनजीक व उपलब्ध असलेल्या रुग्णालये, आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावावेत, त्यांच्याशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन हाताळण्यासाठी परिस्थिती शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत.

आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांकरिता शाळास्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची व्यवस्था करावी, अशाही सूचना शाळांना दिल्या आहेत. अनेक शाळांमध्ये वेळेवर प्रथमोपचार कीटसुद्धा नसते. अशावेळी या निर्देशांचे कुठवर पालन होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button