गडचिरोलीविदर्भ

शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेस दिलासा देणारा अर्थसंकल्प – माजी खा. अशोक नेते

गडचिरोली : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारा असून, देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा आहे, असे मत भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, “या बजेटमुळे कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि गरीब व मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागाचा समतोल विकास साधण्यास हे बजेट मदत करेल.”

शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या योजना

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सिंचन, अनुदाने आणि पतपुरवठा यावर भर दिला असून, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी नव्या योजना राबवण्यात येणार आहेत. तसेच, बेरोजगार तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, महिलांसाठी स्वयंरोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाचे स्वागत करताना अशोक नेते म्हणाले, “हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे सामान्य जनतेच्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी ठरेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button