क्राईमगोंदियाविदर्भ

दिव्यांग महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

गोंदिया जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; दुसऱ्या आरोपीचा मृत्यू

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका गावात जन्मजात दिव्यांग व विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. आरोपी देविदास उर्फ देवा इस्कापे (३८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला. न्यायमूर्ती आर. एन. जोशी यांनी शनिवारी (ता. २) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

१४ सप्टेंबर २०१८ रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका गावात ३९ वर्षीय दिव्यांग महिला आपल्या मुलासोबत घरी असताना भोजराज टेंभुर्णे आणि देविदास इस्कापे या दोघांनी तिच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. त्यांनी महिलेवर बलात्कार केला. या घटनेदरम्यान मुख्य आरोपी भोजराज टेंभुर्णे याने लैंगिक अत्याचार केला, तर देविदास इस्कापे याने त्याला सहकार्य केले. महिलेच्या लहान मुलाने विरोध केल्यावर त्याला मारहाण करून हाकलून लावण्यात आले.

पीडितेच्या मुलाने ही माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी नवेगावबांध पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून दोन्ही आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटला सुरू असताना मुख्य आरोपी भोजराज टेंभुर्णे याचा मृत्यू झाला. त्यामुळे, न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर देविदास इस्कापे याला दोषी ठरवून २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. कृष्णा डी. पारधी यांनी युक्तिवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button