गडचिरोलीविदर्भ

आदर्श पदवी महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ सोहळा उत्साहात

विद्यार्थ्यांना शिस्त, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे घटक असलेले आदर्श पदवी महाविद्यालयामध्ये नुकताच प्रथम वर्ष बी.बी ए. (फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड इकोटुरिझम), बी.एस्सी (डेटा सायन्स) व इतर १ वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी दीक्षारंभ (निओफेस्ट) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य तथा प्रा. वाणिज्य विभाग डॉ. उत्तमचंद कांबळे  तसेच मानव विज्ञान शाखेचे अधिष्ठाता तथा आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम खंडारे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत जीवनात शिस्त, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचा अवलंब करण्याचे महत्व पटवून सांगितले. तसेच महाविद्यालयीन जीवनात अवगत कौशल्याचा उपयोग करून रोजगरभिमुख व्हावे. विद्यार्थीदशेत घडवलेली चांगली सवय ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असते असे प्रतिपादन त्यांनी केले.

सिनेट सदस्य तथा प्रा. वाणिज्य विभाग, डॉ. उत्तमचंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर योग्य कौशल्यांचा विकास करून घेतल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यास अनेक मार्ग खुले होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच एआय तंत्रद्यानाच्या आधीचा विद्यार्थी आणि आताचा यातील अभ्यास करत असतानाचा फरकही त्यांनी सांगितला. तसेच डॉ. श्याम खंडारे यांनी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थी घडत असतात. आपली संस्कृती जपत आई वडिलांची सेवा करणे हे आयुष्यात महत्वाचे आहे. वृद्धाश्रमात एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी प्राध्यापकांना केले.

प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.बी.ए. आणि बी.एस्सी. डिप्लोमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला, आदिवासी नृत्य व वेस्टर्न डान्स प्रकार सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन नेहा डहाळे आणि हर्षद जराते यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रा. रेणुका गव्हारे यांनी केले. संचालन सहा. प्रा. राजश्री परिहार व सहा. प्रा. प्रीती भांडेकर यांनी केले तर आभार सहा. प्रा. रितिक कोहळे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व सहा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. रंगमंच प्रमुख म्हणून सहा. प्रा. अंतबोध बोरकर यांनी काम पाहिले. महाविद्यालयीन जीवनाची नवी पर्वणी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची ओळख करून देणे. तसेच शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थी व विविध उपक्रमांशी त्यांचा सुसंवाद घडवून आणणे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात सुलभ होते. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button