
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता दरवर्षी विद्यालयात क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जातात. याही वर्षी १ ते ८ डिसेंबर दरम्यान क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमात प्रामुख्याने देशी खेळ कब्बडी, खो खो, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक, ॲथलेटिक्स, इत्यादी व पारंपारिक व विविध राज्यांचे संस्कृती यांचे दर्शन या कार्यक्रमातून होणार आहे. या सैनिकोत्सवला सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी यांनी केले आहे.



