गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठाच्या ऑफिसर फोरमची नवीन कार्यकारिणी गठीत

अध्यक्षपदी सहाय्यक कुलसचिव डॉ. संदेश सोनुले 

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या सभागृहात गोंडवाना विद्यापीठ ऑफिसर फोरमची आमसभा विद्यापीठ अभियंता जितेंद्र अंबागडे यांचा अध्यक्षतेखाली पार पडली. या आमसभेमध्ये अनेक महत्तवपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली तसेच नवीन कार्यकारीणी गठीत करण्यात आली.

आमसभेतील विषय सूचीनुसार मागील सहा वर्षांचा वर्षनिहाय अहवाल संघटनेचे सचिव डॉ. हेमंत बारसागडे यांनी वाचून दाखविला तसेच मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या जमाखर्चाचा अहवाल कोषाध्यक्ष देवेंद्र झाडे यांनी सभेसमोर सादर केला. सन २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी गोंडवाना विद्यापीठ ऑफिसर फोरमची नवीन कार्यकारणी सभागृहातील सर्वांच्या मान्यतेने घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी सहाय्यक कुलसचिव डॉ. संदेश सोनुले यांची निवड झाली. इतर पदाधिकाऱ्यात उपाध्यक्ष सहाय्यक कुलसचिव रवींद्र जुनघरे, अधीक्षक विजयालक्ष्मी परचाके, सचिव सहाय्यक कुलसचिव डॉ. कामाजी देशमुख, सहसचिव असिस्टंट प्रोग्रामर प्रमोद बोरकर, कोषाध्यक्ष अधीक्षक सुभाष  देशमुख, कार्यकारणी सदस्य सहाय्यक कुलसचिव देवेंद्र मेश्राम, संगणक विश्लेषक अमोल खोडवे, अधीक्षक उमेश लिखार, अधीक्षक बबीता दुपारे, अधीक्षक अविनाश पोरेड्डीवार यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारीणीमध्ये मार्गदर्शक म्हणून उपकुलसचिव डॉ. हेमत बारसागडे, विद्यापीठ अभियंता जितेंद्र अंबागडे, उपकुलसचिव देवेंद्र झाडे असिस्टंट प्रोग्रॉमर कृष्णा देविकर, सहाय्यक कुलसचिव दिनेश नरोटे यांची घोषणा करण्यात आली. यावेळी गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button