गोंदियाविदर्भ

खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी घेतला खर्च विषयक आढावा

गोंदिया : तिरोडा विधानसभा क्षेत्राचा खर्च विषयक बाबीचा आढावा घेण्याकरिता खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तिरोडा कार्यालयाला भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड, नोडल अधिकारी खर्च जनार्धन खोटरे, खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले, सहाय्यक खर्च निरीक्षक तिरोडा विधानसभा क्षेत्र जिभकाटे, सहाय्यक जिल्हा खर्च नोडल अधिकारी संदिप बोरकर व विधानसभा खर्च संबंधित सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया यांनी उमेदवारांचे खर्च नोंदवताना तसेच पर्यवेक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करण्याच्या दुष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. SOR रजिस्टरमध्ये खर्च नोंदवताना पुरावे म्हणून फोल्डर ऑफ इव्हिडन्स व्यवस्थित ठेवणे, ते सहाय्यक खर्च निरीक्षक यांनी प्रामाणित करणे, दर सूचीनुसार व्यवस्थित दर नमूद करणे, पेड न्यूज तपासताना कोणकोणत्या बाबी तपासणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी अकाऊंटिंग टीम, vvt टीम, सहाय्यक खर्च निरीक्षक व खर्च विषयक विविध टीमला काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत त्या जाणून घेतल्या व त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले तसेच अधिक जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी sst नाका बोंडराणी हद्दला भेट दिली व वाहनाची तपासणी करताना वाहनाचे बोनेट तपासणे बाबत सूचना दिल्या. तसेच सर्व प्रकारची वाहने तपासताना सौजन्यपूर्ण वागणूक ठेवणे बाबत सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button