गडचिरोलीविदर्भ

पात्र सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घ्या

माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासह युवकांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन  

गडचिरोली : नुकत्याच शासनाच्या नियमाप्रमाणे जिथे शिक्षक नाही, तिथे सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, हे सगळे करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील जे बेरोजगार तरुण या पदास पात्र आहेत, त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा राखला जाण्यासाठी हे अजिबात योग्य नाही. सरकारच्या तसेच सामाजिक दृष्टिकोनातूनही हे योग्य नाही. म्हणून जिल्ह्यातील त्या-त्या गावांमधील सुशिक्षित बेरोजगार पात्र युवकांना सामावून घेऊन सरकारने त्यांच्यासोबत न्याय करावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

चिमूर येथे होऊ घातलेल्या महामेळाव्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पात्र सुशिक्षित बेरोजगार युवकांसोबत भेट घेऊन त्यांना यावेळी निवदेन दिले. तसेच त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देऊन शिक्षण विभागाला तत्काळ कार्यवाही करण्यासंबंधित सूचना केली आहे. यावेळी जिल्ह्यातील शिक्षण पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button