गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

दुर्गम भागात मूलभूत सुविधा त्वरित पुरवा ; ‘त्या’ मुलांच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई द्या – अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागात मूलभूत सुविधा पुरवून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती करणे व जनतेचे दैनंदिन जगणे सुकर करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करा, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. पक्षाच्या एका शिस्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना नावे निवेदन सादर केले.

जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला अजूनही मूलभूत सोयी-सुविधा नसल्याने त्याचे दैनंदिन जीवन अतिशय खडतर आणि यातनामय झाले आहे. विशेषतः पावसाचे दिवसात त्यांना रस्ते व पुलाअभावी दवाखान्यात पोहोचण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागतो तसेच अनेकदा लोकांचा जीव सुद्धा गमवावा लागतो, अशा घटना मागील अनेक वर्षांपासून घडत आहे .

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन सुद्धा या जिल्यातील नागरिकांना अशा यातना भोगाव्या लागत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हे सर्व नागरिकांच्या मानवी व मूलभूत अधिकारांचे हनन आहे. तरी पण सरकारचे व प्रशासनाचे त्याकडे फारसे गंभीर लक्ष नाही असे निवेदनात म्हटले आहे.

आदिवासी विकासावर अब्जोवधी रुपये खर्च होऊनही आज अशी परिस्थिती आहे, ही बाब जिल्ह्यासाठी फारच गंभीर आहे आणि हा निधी कोठे गेला असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. काल पर्वा सुद्धा अहेरी तालुक्यातील दोन निष्पाप मुलांना वैदूच्या उपचार नंतर जीव गमवावा लागला आणि रस्ते व साधनाअभावी त्या मुलांचे प्रेत आई-वडीलांना १५ किलोमीटर पर्यंत आपल्या खांद्यावर वाहून आणावे लागल्याची अत्यंत दुःखद घटना घडली, याकडे लक्ष वेधण्यात आले.

येर्रागड्डा येथील मृतक मुलांच्या आई-वडीलांना नुकसान भरपाई देण्यात यावी, दुर्गम भागातील रस्ते व पुलांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, या भागात बारमाही वाहतुकीची साधने उपलब्ध करण्यात यावी, सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर, अन्य स्टाफ, औषधसाठा व वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, दुर्गम भागातील लोकांमध्ये अजूनही अंधश्रद्धा असल्याने त्यांच्या जागृतीसाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात यावी, वैदूंचे काम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच त्यांना आरोग्य व अंधश्रद्धा बाबत प्रशिक्षण देण्यात यावे, सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात यावे व न राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्याही यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने करण्यात आल्या.

यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, सचिव राजन बोरकर, गडचिरोली विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, जेष्ठ कार्यककर्ते दादाजी धाकडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा कल्पना रामटेके, सहसचिव कविता वैद्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button