गडचिरोलीविदर्भ

सुरजागड आणि हेडरीतील लोहखाणींची क्षमता वाढविण्यासाठी आज जनसुनावणी

गडचिरोली : लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लि.यांच्या सुरजागड आणि हेडरी येथील लोहखाणीतील क्रशिंग आणि स्क्रिनिग प्लान्टसह वार्षिक क्षमता 10.0 एमटीपीए ते 26.0 एमटीपीए पर्यंत वाढविण्यासाठी, तसेच हेडरी येथील लो ग्रेड आयरन ओर प्लान्ट 45 दशलक्ष टन प्रतिवर्ष वाढविण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून आज जनसुनावणी घेतली जात आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत या दोन्ही ठिकाणच्या प्रकल्प विस्तारासंबंधीच्या जनसुनावणी होणार आहेत. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता हेडरी येथील प्रकल्पासाठी तर दुपारी 2 वाजता सुरजागड येथील प्रकल्पासाठी जनसुनावणी होणार हे. त्यासाठी या दोन्ही परिसरातील नागरिक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यावेळी प्रदुषण नियंत्रणासंदर्भात नागरिक आपल्या शंका उपस्थित करतील, तर कंपनीच्या वतीने त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ चित्रीकरणात ही जनसुनावणी घेतली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button