गडचिरोलीविदर्भ

आरडा येथील मल्लिकार्जुन देवस्थान यात्रा दारूविक्रीमुक्त करा

गाव संघटनेचे पोलिस विभागाला निवेदन

गडचिरोली : दक्षिण टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील आरडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करून मल्लिकार्जुन देवस्थान यात्रा दारूविक्रीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा, अशी मागणी गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिरोंचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

आरडा गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याने शांतता व सुव्यवस्था भंग झाली आहे. परिणामी महिलांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे दारूविक्री थांबवणे गरजेचे आहे. तसेच गावात प्रसिद्ध अशी मल्लिकार्जुन देवस्थान यात्रेचे आयोजन 7 व 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारची दारूविक्री होऊ नये व यात्रा शांततेत पार पडावी, याकरिता पोलिस विभागाने गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी. आमच्या गावात सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत करून, दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी मुक्तीपथ गाव संघटनेने केली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दारूविक्री बंद करण्यासाठी व 100 टक्के दारूविक्रीमुक्त यात्रा करण्यासाठी चोख बंदोबस्त लावण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button