गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत ‘ढोल-डफरा बजाओ’ आंदोलन: अवैध मुरूम उत्खननप्रकरणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

मागील ३६ दिवसांपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू; जेपी इन्फ्रास्ट्रक्चर आणि बीएसएनएल कंपन्यांवरही कारवाईची मागणी

गडचिरोली : गडचिरोली येथे अवैध मुरूम उत्खनन आणि वन्यजीव संरक्षण नियमांच्या उल्लंघनासंदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ३६ दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन आता अधिक तीव्र होणार आहे. आंदोलकांनी सोमवार, २८ जुलै रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ‘ढोल-डफरा बजाओ’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आंदोलकांचा आरोप आहे की, वडसा वन विभागातील आरमोरी वनपरिक्षेत्र आणि पोर्ला वनपरिक्षेत्रातून जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वन्य प्राणी वावर क्षेत्रातून रात्रीच्या वेळेस अवैध मुरूम वाहतूक केली आहे. आरमोरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले आणि वनरक्षक पाटील यांनी ३३ हायवा आणि तीन पोकलेनवर जप्तीची कारवाई आंदोलकांच्या समक्ष केल्याचे भासवले असले तरी, मागील तीन महिन्यांपासून सदर कंपनीवर कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाही.

पोर्ला वनपरिक्षेत्रातून टीसीएम आणि तार कंपाऊंड तोडून मुरूम वाहतूक करण्यात आली आहे. याबाबत संबंधित वडसा देसाईगंज उपवनसंरक्षक यांना पुरावे देऊनही, हेतूपुरस्सर कंपनीच्या बाजूने अहवाल देऊन संबंधित कंपनीस व अधिकारी-कर्मचारी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत दोन्ही वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत सदर ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

याव्यतिरिक्त, जीमलगट्टा वनपरिक्षेत्रातून बीएसएनएल कंपनीने फायबर केबल टाकण्यासाठी एचडीडी मशीन वापरण्याचे प्रयोजन असतानाही, वाईल्ड लाईफ परिक्षेत्रातून जेसीबीने उत्खनन करून उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने नियमबाह्य कामे केली. त्यामुळे जोपर्यंत यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत सदर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील, असेही आंदोलकांनी म्हटले आहे. आंदोलकांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button