
गोंदिया : मनात आलेल्या नैराश्यापोटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गुरुवारी (दि. ६) उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यामध्ये, सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथील भास्कर तिमाजी थेर (२७) याने शुक्रवारी घरीच विष प्राशन केले. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील ग्राम मुंडीपार-बटाणा येथील सुरेश मनोहर ठाकूर (२५) या तरुणाने घरीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिसऱ्या घटनेत आमगाव तालुक्यातील ग्राम नवेगाव येथील (१८) वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. चौथ्या घटनेत आमगाव तालुक्यातील ग्राम मक्कीटोला येथील मारोती नारायण तुमडाम (३५) या तरुणाने घरीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.



