गडचिरोलीविदर्भ

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय – आ. डॉ. देवराव होळी

कुनघाडा येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा

चामोर्शी : भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत, लाडक्या बहिणींना १५०० रुपये प्रतिमाह मानधन, मुलींना मोफत शिक्षण असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी कुनघाडा येथील लाडक्या बहिणींच्या भव्य मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाचे ओबीसी नेते बाबुराव कोहळे, जयश्री धोडरे, प्रभाग संघ अध्यक्ष कमल दुधबले, सचिव अर्चना वाघाडे. बँकसखी शकुंतला तुंकलवार, दर्शना नैताम, वंदना ठाकूर, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

या मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आमदार डॉ. देवराव होळी यांच्यावर असणारे स्नेह व्यक्त केले. मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आमदार डॉ. होळी यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button