
तळोधी पोलिसांची कारवाई ; वाहनचालकाला अटक
चंद्रपूर : नागभिड ते सिंदेवाही मार्गावर चिखलगाव फाट्याजवळ आज शनिवार दि. २९ मार्चला पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन तपासणी करीत असतांना महिंद्रा एक्स. यु. व्ही. ५०० (क्रमांक एम. एच. ४० बी.सी. ०३८८) या कारमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा प्रवरा नगर डिस्टिलरी देशी दारूनी भरलेल्या प्रत्येकी ९० एम. एल. च्या १०० प्लास्टीक सिलबंद शिशाअसलेले ६० खोके आढळून आले. चारचाकी वाहनासह १७ लाख १० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. वाहन चालक शेख अरशद ईक्बाल अहमद (वय २७) रा. गौतम वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागभिडकडुन तळोधी कडे एक संशयीत वाहन येत असल्याची गोपनिय खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस स्टेशन तळोधीच्या ठाणेदार सपोनि संगीता शंकरराव हेलोंडे यांनी पोउपनि किशोर मानकर, डि. ओ. पोहवा रत्नाकर देहारे, मपोअं वैष्णवी लेनगुरे, पोअं उत्तम धुगवा, होमगार्ड सैनिक पवन आखरे, चापोहवा सुरेश आत्राम सह सोबत २ पंच यांनी नागभिड ते सिंदेवाही जाणा-या हायवे रोडवर चिखलगाव फाटा येथे नाकेबंदी केली दरम्यान एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले.
पोलिसांनी वाहन थांबविले व वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात रॉकेट देशी दारू खरडयाचे खोके दिसले. चारचाकी वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात ६० खोके दिसले. त्यात रॉकेट देशी दारू संत्रा प्रवरा नगर डिस्टिलरी देशी दारूनी भरलेल्या सिलबंद शिशा दिसल्या. अशा ६० खोक्यामधील एकुण ६००० नग रॉकेट देशी दारू किंमत २ लाख १० हजार पोलिसांनी जप्त केली. देशी दारू व वाहतुकी करीता वापरलेले वाहन किंमत १५,००,०००/-रू. असा एकुण १७,१०,०००/-रू. चा माल पंचासमक्ष मोक्यावर जप्ती करून ताब्यात घेण्यात आला. सपोनि संगीता हेलोंडे, ठाणेदार, पो. स्टे. तळोधी बा. यांचे लेखी रिपोर्ट वरून अपराध कांक ००३७/२०२५ कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.



