गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत झोनस्तरीय निरंकारी महिला संत समागमाचे आयोजन

गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील हजारो भाविक होणार सहभागी

गडचिरोली : संत निरंकारी मंडळाच्या वतीने १० ऑगस्ट रोजी आरमोरी रोडवरील संस्कृती सांस्कृतिक भवन येथे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत झोनस्तरीय निरंकारी महिला संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या या महिला संत समागमात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

या संत समागमाची विशेष बाब म्हणजे, यात मुख्य प्रवचन, संचालन, भजन आणि विचार महिलांद्वारेच सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमात ‘ईश्वर एक असून त्याचे साक्षात्कार करून भक्तीचा आनंद कसा घेता येईल’, तसेच ‘विश्वबंधुता, मानवता, प्रेम यांसारख्या दिव्य गुणांनी जग कसे आनंदी करता येईल’, यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, व्यक्ती आनंदी जीवन कसे जगू शकते, यावरही विचारमंथन होईल.

संत निरंकारी मंडळाचे झोन प्रमुख किशन नागदेवे आणि गडचिरोली शाखा प्रमुख गजानन तुनकलवार यांनी सर्व ईश्वरप्रेमी जनतेला या संत समागमाला उपस्थित राहून आध्यात्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button