गडचिरोलीविदर्भ

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये ९ हत्तींचा अधिवास

अनुकूल वातावरणामुळे सर्व हत्ती सुखरूप ; पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

गडचिरोली : अजित, गणेश, मंगला, बसंती, रूपा, लक्ष्मी, प्रियंका, राणी, कुसूम ही नावे आहेत. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्तीकॅम्पमध्ये वास्तव्याला असलेल्या गजराजांची एकूण 9 हत्तींचा अधिवास असलेले कमलापूरचे हे हत्ती कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. त्यामुळे दैनंदिन या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळत आहे. वनविभागाकडून ही गर्दी हाताळताना हत्तींची गैरसोय होऊ नये, याची काळजी देखील घेतली जात आहे.

जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने कमलापूर येथील हत्ती कॅम्पचा आढावा घेतला असता, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी 9 हत्तींचा अधिवास दिसून आला. यात अजित, गणेश, मंगला, बसंती, रूपा, लक्ष्मी, प्रियंका, राणी, कुसूम यांचा समावेश आहे. कमलापूरपासून अवघ्या 5 किमी अंतरावर घनदाट जंगलात आणि तलावाजवळ हे कॅम्प वसले आहे. हत्तींना पूरक आणि पोषक असे तिथले वातावरण आहे. कमलापूरचे हे सुखकारक चित्र असले तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र गेल्या दोन वर्षात मानव-हत्ती संघर्ष पहावयाला मिळाला.

ओडीसामार्गे छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने धानोरा, गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, देसाईगंज या तालुक्यांसह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात देखील आकडतांडव केला होता. यात जवळपास पाच व्यक्तींचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. शिवाय शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानकपणे दाखल झालेले हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे ठरले. ज्याचा धसका जिल्ह्यातील जनता अजूनही बाळगून आहे. मानव-हत्ती संघर्ष ही चिंतेची बाब आहे. कारण, मानवी लोकसंख्या वाढते आणि जंगलाचे आच्छादन कमी होते. हत्तींना मानवी वस्तीच्या जवळ जाण्याला भाग पाडले जाते. या घटनांमध्ये पिकांचे नुकसान आणि आर्थिक नुकसान होते. तसेच हत्ती आणि मानवी मृत्यू यांचाही या संघर्षात मृत्यू होतो.

जागतिक हत्ती दिन हा 12 ऑगस्ट रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय वार्षिक कार्यक्रम आहे. जो जगातील हत्तींच्या संरक्षण आणि संरक्षणासाठी समर्पित आहे. जागतिक हत्तीदिनाचे उद्दिष्ट आफ्रिकन आणि आशियाई हत्तींच्या तातडीच्या दुर्दशेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि बंदिवान आणि वन्य हत्तींच्या चांगल्या काळजी आणि व्यवस्थापनासाठी ज्ञान आणि सकारात्मक उपाय सामायिक करणे हे आहे. त्याअनुषंगाने दरवर्षी हा 12 ऑगस्टचा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button