गडचिरोलीविदर्भ

अतिक्रमण धारकांना कायदेशीर जमिनीचे पट्टे मंजूर करावे! – माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन

मुलचेरा : ग्रामपंचायत शांतिग्राम येथील महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

निवेदनात स्थानिक शांतिग्राम येथील ४२ महसूल जमीन अतिक्रमणधारकांना त्यांच्या ताब्यातील जमिनींचे कायमस्वरूपी पट्टे मंजूर करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना कायदेशीर संरक्षण मिळून त्यांच्या शेती व निवासस्थाना बाबत स्थैर्य निर्माण होईल. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलचेरा तहसीलदार यांनी निवेदन स्वीकृत करून संबंधित बाबींचा सकारात्मक प्रतिसाद दिला.

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, जिल्हा सचिव बादल शाह, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे, उपसरपंच तपन मल्लिक, वैष्णव ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button