गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधीचा वापर स्थानिक गौण खनिज उत्खनन करण्यात येणाऱ्या तालुक्यात आधी करण्यात यावा – प्रणय खुणे

खनिज निधीचा वापर इतर तालुक्याच्या ठिकाणी केल्यामुळे स्थानिक तालुका विकासापासून वंचित?

गडचिरोली : जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधीद्वारे गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहे. परंतु सदर विकासकामे जिल्ह्यातील इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील खनिज उत्खनन एटापल्ली तालुक्यातील सुरजागड या भागातून होत आहे. परंतु या भागातील दहा किलोमीटर अंतरावरील अनेक गावात जाण्यासाठी साधे खडीकरणाचे रस्ते सुद्धा आजपर्यंत झाले नाही. अनेक नाल्यावर साधे पुलिया सुद्धा झाले नाही, येथील अनेक गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटतो व पुलिया नसल्यामुळे नावेचा वापर करून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. शाळकरी विद्यार्थ्यांची पावसाळ्यात शाळेत व तालुक्यात ये-जा बंद असते आणि अनेक विकासकामे सुरजागड गौण खनिज उत्खनन पहाडी प्रभागात शिल्लक आहेत.

परंतु सदर विकासकामे याच भागात होत नसून सदर खनिज प्रतिष्ठान निधी जिल्ह्यातील इतर भागातील अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे सुरजागड परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील अनेक गावे विकासापासून वंचित आहेत आणि स्वातंत्र्याचे इतक्या वर्षापासून आजपर्यंत या गावांचा विकास झाला नाही आणि या गावांमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक व दळणवळण विकासाची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील सुरजागड येथून लोह खनिज ने-आन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते नाल्या व मोठमोठे पुलिया तयार करण्यात येत आहेत. परंतु एटापल्ली तालुक्यातील अनेक गाव रस्ते नाली आणि पुलिया पासून वंचित आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधी सर्वात आधी एटापल्ली तालुक्यातील विविध गावांचा विकास करण्यासाठी व येथील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास करण्यासाठी करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद शेख, गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे, भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू समरीत, महिला आघाडी अध्यक्ष मनिषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, मुन्ना दहाडे, महेश अलोणे, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सल्लागार फारुख शेख, सुरेश दुर्गे, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, एटापल्ली तालुकाध्यक्ष स्वप्नील मडावी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना अहेरी तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button