
देसाईगंज येथिल किंडर किड्स स्कुलमध्ये नाविण्यपुर्ण उपक्रम
देसाईगंज : विद्यार्थी हाच देशाच्या जडण-घडणेचा पाया असतो. शिक्षण घेत असताना शालेय जिवनात जे संस्कार घडतात त्यातुन समाजात सुजान नागरिक, वैज्ञानिक, देशाचे संरक्षक, उत्कृष्ट राजनेता आणि समाजिक प्रगतीसाठी हातभार लावणारे विविध अष्टपैलु व्यक्तिमत्व निर्माण होतात. शाळा व्यवस्थापनाने या भावनेतुन विद्यार्थी घडवावे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
येथील किंडर किड्स स्कुलमध्ये सातवे वार्षिक समारोह कार्यक्रमाचे आयोजन २ एप्रिलला करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे, तहसिलदार प्रिती डुडुलकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, नप माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उद्योगपती रोहित अग्रवाल, छोटे मश्जिद शोला, यांचेसह शहरातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना कृष्णा गजबे म्हणाले की, देशाला व समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कार्य अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थी जिवनात ज्या संस्कारांची जळणघळण होते, त्यातुन चांगले व्यक्तिमत्व निर्माण होतात. देशाला व समाजाला प्रगती वर नेण्यासाठी सुजान नागरिक, वैज्ञानिक, देश संरक्षक, उत्कृष्ट राजनेता असे विविध व्यक्तिमत्व शालेय जिवनातुनच निर्माण होतात. त्यामुळे चांगले संस्कार निर्मिती शालेय जिवनातुन व्हावी, यासाठी संस्थांनी प्रयत्न केले पाहिजे. किंडर किड्स स्कुलमध्ये नर्सरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याची परंपरा असुन विद्यार्थ्यांनी भावी जीवनात प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रुही सतवानी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



