भंडाराविदर्भ

शेतात गांजाची चोरीछुपे लागवड

२०२४ वर्षात सर्वाधिक ५३ कारवाया ; १५ आरोपींना अटक

भंडारा : गांजाचे झाड हुबेहूब झेंडूच्या झाडाप्रमाणे दिसणारे असते. हे झाड नशेखोरीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. झेंडूच्या पानाला काही किंमत नसते. परंतु, गांजाच्या पानांपासून ते त्याच्या बोंडापर्यंत सर्वच नशेसाठी वापरले जाते. महाराष्ट्रात गांजाची लागवड करण्यास बंदी आहे. मात्र, कमी वेळेत जास्त पैसे देणारे हे झाड म्हणून काहीजण गांजाची चोरीछुपे लागवड करतात. जिल्ह्यात गांजाचे उत्पादन होत नसले तरी तस्करी व वापर होत असतो.

गांजाचे उत्पादन, वापर व तस्करीवर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया केल्या जातात. गांजा पिकाची महाराष्ट्रात शेती करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातून गांजा मोठ्या प्रमाणावर राज्यात आणून विकला जातो.

लगतच्या राज्यातून काहीजण झटपट पैसे कमावण्याच्या नादात गांजा पिकाची आंतरपिकाप्रमाणे लागवड करतात. अनेकदा उसाच्या फडात, झेंडूच्या फुलांमध्येही गांजाचे पीक घेतले जाते.

जे नशा करून गांजाच्या आहारी गेलेले असतात त्यांना या गांजाच्या झाडाची लवकर ओळख पटते. वाळलेला गांजा हा १० ते १२ हजार रुपये किलोपर्यंत विकला जातो. गांजा लावगड करून विक्रीसाठी बाजारात आणणे कायद्याने गुन्हा आहे. गांजाची लागवड केली अन् झाडे मोठी झाल्यावर त्याचा वास परिसरात दरवळतो. पावसाळ्यात गांजा ओलसर व नरम झाल्यावर त्याची आवक कमी होते. त्यामुळे त्याचा भाव प्रतिकिलो २० हजारांपर्यंत पोहोचतो. जिल्ह्यात गांजा पिकाची लागवड होत नसली तरी अद्यापही विविध साधनांद्वारे वाहतूक व सेवन होताना दिसून येते.

राज्यात गांजाला बंदी असून, या नशेडी पदार्थाचे कोणी पीक घेतले, त्याची विक्री केली तसेच तस्करी केली तर अशा आरोपींना दहा वर्षे कारावास व दोन लाखांचा दंड अशी कायद्यात तरतूद आहे. आरोपींना लवकर जामीनही मिळत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button