गडचिरोलीविदर्भ

शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळण्यास सुरुवात – माजी आ. कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांनी टीडीसी तथा आदिवासी फेडरेशन अंतर्गत विक्री केलेल्या धान्य विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले. शेतकऱ्यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदन दिले असता माजी आमदार कृष्णा गजबे यांनी तात्काळ वि.सी. द्वारे अन्नपुरवठा विभागातील सचिव यांच्यासोबत सखोल चर्चा करून शेतकऱ्यांचे धान्य चुकारे तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी केली होती.

यावेळी अन्नपुरवठा विभागातील सचिव यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांना तांत्रिक अडचणीमुळे टीडीसी व फेडरेशनच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. परंतु आता आदिवासी व फेडरेशन विभागाच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले असून येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात धान्य विक्रीचे पैसे जमा होणार असल्याचे अन्नपुरवठा विभागातील अधिकारी यांनी माजी आ. कृष्णा गजबे यांना सांगितले.

शेतकऱ्यांच्या नेहमी हाकेला धावून जाणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता मदत केल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button