गडचिरोलीविदर्भ

कैकाडी समाज नगर, शिव नगर, समता नगर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

गडचिरोली : महायुती सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे विकासपुरुष माजी कॅबिनेट मंत्री व आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अमोल कुळमेथे यांच्या उपस्थितीत मंगळवार, 11 फेब्रुवारी ला गडचिरोली दलित वस्ती मधील समता नगर, शिव नगर, कैकाडी समाज वस्तीतील विविध वार्डातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवीन कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य रविंद्र वासेकर यांनी दुपट्टे टाकून स्वागत केले.

नगरसेवक लौकिक भिवापुरे, हरिष राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सोनल कोवे, यांच्या उपस्थितीत सुनील जगन्नाथ, रामा कंडेलवाल, गोपाल जगन्नाथ, गुरुदेव केदारी, समय्या कुंभारे, सारय्या कुंभारे, राजू जगन्नाथ, अविनाश जाधव, डॅनियल कंडेलवाल, इसराइल कुंभारे, अक्षय जगन्नाथ, कल्पना जाधव, उज्वला कुंभारे, लक्ष्मी जगन्नाथ, सरिता कंडेलवार, पापम्मा जगन्नाथ, वंदी केदारी, वच्छला कुंभारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसध्ये पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, युवा नेते अजय कुकडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, भटक्या जमाती जिल्हाध्यक्ष किशोर बावणे, जितेंद्र दुधे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button