
११४ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने ‘मोहन ते महात्मा, सत्याग्रही बापू, हिंद स्वराज व हमारे गाव का पुनर्निर्माण’ या विषयावर “गांधी विचार संस्कार परीक्षा-२०२४” पार पडली.
अहिंसा, सत्य व शांततेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दिलेल्या जीवन मूल्यांचा प्रसार करून भावी पिढ्यांना संस्कारीत करणे व महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमाद्वारे अहिंसक समाज निर्मितीच्या कार्यात तरुणांची सक्रियता वाढविणे तसेच शांतता प्रेम बंधुता सत्य अहिंसा सामंजस्य व स्वदेशी आदींची शिकवण देऊन एक आदर्श नागरिक व्हावेत या हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
गांधी विचार संस्कार परीक्षा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांच्या देखरेखीखाली पार पडली. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्रा. पुंडलिक व्याहाडकर, प्रा. गजानन बोरकर, विवेक बोरकर यांनी सहकार्य केले. या महाविद्यालयातील ११४ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हि परीक्षा दिली.



