
भामरागड : तालुक्यातील अधिकारी आढावा बैठक खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तहसील कार्यालय सभागृहात गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, जन सुविधेत येणारे सर्व कामाच्या संदर्भात चर्चा करून कामाबद्दल माहिती घेऊन जनतेचे समस्याचे निवारण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले .
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत गोगामी, अहेरी तालुका अध्यक्ष डॉ. पप्पू हकीम, अजु हकीम, प्रमोद आत्राम, तुळशीदास चंदनखेडे, प्रशांत गोडसेलवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.



