क्राईमभंडाराविदर्भ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास

भंडारा : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एका ५५ वर्षीय नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एल. देशपांडे यांनी २० वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्याचे नाव मधुकर हरी रंगारी रा. ओपारा ता. लाखांदूर असे आहे.

ही घटना ३ ऑगस्ट २०२१ रोजी लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास घडली होती. पीडित अल्पवयीन मुली दुपारी सलवार शिवून झाला की नाही हे पाहण्यासाठी जात असताना त्या नराधमाने दोन्ही मुलींना घरात बोलावून अत्याचार केला. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वीर चहांदे यांनी तर सरकार पक्षातर्फे दुर्गा तलमले यांनी साक्षदार तपासले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button