
ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणी) येथील घटना
ब्रम्हपुरी : उन्हाळी धानाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. शेतकरी आणि वाघात झालेल्या लढाईत अखेर वाघाने पळ काढला. गोवर्धन डांगे (वय ५३) रा. नांदगाव असे जखमी शेतकऱ्यांचे नाव आहे.
शेतकरी गोवर्धन डांगे हे सकाळी 7 वाजता शेतात धान पिकाला पाणी देत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने डांगे यांच्यावर हल्ला चढवीला दरम्यान दोघात झुंज झाली, डांगे यांनी समयसूचकता साधत शेजारील विहिरीत आश्रय घेतला आणि मुलाला फोन केला. त्यांचा मुलगा गावकऱ्यांना सोबत घेऊन आल्याने वाघाने पळ काढला. यात सुदैवाने डांगे वाघाचे भक्ष ठरू शकले नाही.
शेतकरी डांगे गंभीर जखमी झाल्यामुळे ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.



