गडचिरोलीविदर्भ

शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुरखेडा तालुका शिवसेना पक्ष संघटन मजबूत

कुरखेडा : आगामी स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम जोरात सुरु आहे. अशातच कुरखेडा येथील शेकडो सक्रिय युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लखपती दीदी, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ यासारख्या जनतेसाठी कल्याणकारी योजना आणल्याने, तसेच शिवसेना विदर्भ नेते विकासाचे महामेरु किरण पांडव यांच्यावर विश्वास ठेवून तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील शिवसेनेची पकड मजबूत झालेली आहे.

जिल्ह्यातील कुरखेडा येथे शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख संदीप बरडे (पाटील) यांचे शुभ हस्ते शेकडो युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे शिवसेना, युवासेना जिल्हाध्यक्ष दिपक भारसागडे, आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक नारायण धकाते, आरमोरी विधानसभा समन्वयक राकेश बैस, तालुकाध्यक्ष अनिकेत आकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अनिकेत आकरे यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्यांपैकी ईश्वर ठाकूर तालुका संघटक, मुकेश माकडे तालुका प्रसिद्धी प्रमुख, शहेजाद हाश्मी तालुका वैद्यकीय प्रमुख, दीपक धारगाये युवासेना तालुका प्रमुख, चेतन मैंद युवासेना शहरअध्यक्षपदी नियुक्ती करून संदीपजी बरडे (पाटील) व राकेश बेलसरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button