गडचिरोलीविदर्भ

आरमोरी मतदार संघातील घरकुल लाभार्थ्यांना एक कोटीचे अनुदान

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

देसाईगंज : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या विभागाकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आरमोरी मतदार संघातील लाभार्थ्यांसाठी एक कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले. त्याचा जीआर काल काढण्यात आला.

या अनुदानामुळे आरमोरी मतदार संघातील अनेक कुटुंबांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने संबंधित लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

माजी आ. गजबे यांनी या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button