गडचिरोलीविदर्भ

सेवानिवृत्त तहसीलदार सुखदेव वासनिक यांचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश

गडचिरोली : येथील सेवानिवृत्त तहसीलदार आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुखदेव वासनिक यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे यांनी जिल्हा कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात पुष्पगुच्छ आणि सदस्यता पावती देऊन वासनिक यांचे पक्षात स्वागत केले.

रिपब्लिकन पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, गडचिरोली विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते जगन जांभुळकर, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवा आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, सचिव पुण्यवान सोरते हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खोब्रागडे म्हणाले की, सुखदेव वासनिक यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव सर्वसामान्यां साठी उपयुक्त ठरेल. वासनिक म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आदर्श घेऊन चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची ध्येय धोरणे आपणास आवडल्याने मी या पक्षात प्रवेश करीत आहे. या पक्षात सामील झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि पक्षासाठी आपल्या क्षमतेनुसार काम करेन.

याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते दादाजी धाकडे, पुरुषोत्तम उंदीरवाडे, राज सुखदेवे, दुर्वास टेंभुर्णे, महिला कार्यकर्त्या प्रतिमा बोदेले, वंदना भैसारे, प्रमिला शेंडे, सुजाता उंदीरवाडे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button