
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रम आराखड्यानुसार नाविण्यपुर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था गोंदिया व गोंदिया जिल्हा अधिकृत लेखापरीक्षक असोसिएशन गोंदिया यांचेतर्फे शासकीय कर्मचारी व शासकीय लेखापरीक्षक तसेच प्रमाणित लेखापरीक्षक यांची आरोग्य तपासणी सहयोग हॉस्पीटल गोंदिया येथील वैद्यकीय अधिकारी व सहकारी यांचेमार्फत दि.17 एप्रिल 2025 रोजी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, रुम नं.29, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे करण्यात आली.
सदर आरोग्य तपासणी शिबिरात नविन प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष कावळे, नेत्र तपासणी नेत्रतज्ञ डॉ. अश्विनी मेघरे, तसेच सहयोग हॉस्पीटल गोंदिया येथील वैद्यकीय सहकारी पलाश लोहे, वैशाली, गरिमा यांनी केले.
या आरोग्य शिबिरात शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. सदर आरोग्य तपासणी शिबिरात कार्यालयाचे अधीक्षक डी.व्ही. निनावे, लेखापरीक्षक सहकारी संस्था गोंदिया तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. लेखापरीक्षक सहकारी संस्था गुणवंत बावनकुळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.



