गडचिरोलीविदर्भ

जंगलात आढळला कुजलेला मृतदेह

आरमोरी : शहराजवळील डम्पिंग यार्ड लगतच्या जंगलात २६ एप्रिल रोजी कुजलेला मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने जागेवरच उत्तरीय तपासणी केली. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी शहरालगतच्या डम्पिंग यार्डपासून ५०० मीटर अंतरावर जंगलात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले व नंतर पोलिसांना कळविले. पो.नि. कैलास गवते हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले. न्यायवैद्यक चाचणीसाठी पथकाच्या मदतीने मृतदेहाच्या हाडाचे नमुने घेतले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून जागेवरच उत्तरीय तपासणी केली.

घटनास्थळी अंडरवियर आढळली. हा मृतदेह पुरुषाचा असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ओळख पटविण्यासाठी बेपत्ता व्यक्तींची माहिती घेणे सुरू आहे. दरम्यान, मृत्यूमागील कारण स्पष्ट झालेले नाही. १५ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. मृत्यूमागचे कारण जाणण्यासाठी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक की घातपात हे समजणार आहे. त्यानुसार पोलिसांच्या कारवाईची दिशा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button