आरोग्यगोंदियाविदर्भ

‘सेवा हक्क दिना’निमित्त आरोग्य विभागाकडून मानवी साखळीद्वारे जनजागृती

योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार

गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्तीनिमित्त गोंदिया जिल्हा आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाने संयुक्तपणे ‘सेवा हक्क दिना’चे आयोजन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेतील मध्यवर्ती सारस चौकात मानवी साखळीद्वारे आरोग्य कार्यक्रम आणि योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.

या जनजागृती कार्यक्रमात आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयातील अधिकारी, समन्वयक आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बॅनर आणि पोस्टर्सच्या माध्यमातून विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

मानवी साखळीद्वारे जनजागृती करणे हा एक प्रभावी आणि सामुदायिक प्रयत्न असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मुळे विविध शासकीय सेवा आणि त्यांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्र हे नेहमीच लोकभिमुख आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते आणि याच भूमिकेतून दहा वर्षांपूर्वी, २८ एप्रिल २०१५ रोजी या अधिनियमाद्वारे अनेक सेवा सुलभपणे जनतेला उपलब्ध करून देण्यात आल्या.

आरोग्य विभागाने ‘सेवा दिना’चे औचित्य साधून जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, माहेर घर योजना, मानव विकास कार्यक्रम, नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रम, नियमित लसीकरण कार्यक्रम आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम यांसारख्या विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती मानवी साखळीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली, असे डॉ. रोशन राऊत यांनी सांगितले.

या जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तनया चौधरी, संकेत मोरघरे, दिनेश माकिजा, कैलाश चिचामे, कैलाश खांडेकर, पवन फुंडे, राकेश राकडे, संजय दोनोडे, राजेश दोनोडे, मनिषा देशमुख, कल्याणी चौधरी, मंजु रहांगडाले, डॉ. श्रुती राणा, अल्का मिश्रा, डॉ. पंकज पटले, भूमी देशमुख, लक्ष्मी सावरकर, सारनाथ बोरकर, सपना खंडाईत, विरेंद्र उके, उकादास बिसेन आणि अजय यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button