गडचिरोलीविदर्भ

अशक्य ते शक्य! अरविंद कात्रटवारांच्या प्रयत्नांमुळे मोहटोला-निमगाव रस्त्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण ; नागरिकांना दिलासा

लोकप्रतिनिधींना जमले नाही ते शिवसेनेच्या पाठपुराव्याने साध्य ; धोकादायक मार्गाची समस्या दूर

गडचिरोली : सत्ता असो वा नसो, लोकशाही मार्गाने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून विकासासाठी धडपड केल्यास कोणतीही समस्या दूर होऊ शकते, हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी दाखवून दिले आहे. जे लोकप्रतिनिधींना करता आले नाही, ते मोहटोला-निमगाव रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यास त्यांनी प्रशासनास भाग पाडले. त्यामुळे या मार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून, या भागातील वाहतुकीची समस्या दूर झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोहटोला-निमगाव मार्गावर ३० वर्षांपूर्वी रेज कॉजवेचे बांधकाम करण्यात आले होते. हा मार्ग गडचिरोली, आरमोरी व धानोरा येथे ये-जा करण्यासाठी सोयीस्कर असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या मार्गाने शाळेकरी विद्यार्थीही मार्गक्रमण करतात. जुन्या रेज कॉजवेची भिंत कोसळल्याने पूल कोसळून मोठी अपघाताची घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पुलावरून मार्गक्रमण करणे अत्यंत धोकादायक झाले होते.

सदर गंभीर बाब लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी आपल्या शेकडो शिवसैनिकांसह बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत, मोहटोला-निमगाव रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी रेटून धरली होती.

अरविंद कात्रटवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते की, मोहटोला-निमगाव मार्गावरील नाला पावसाळ्यात तुडूंब भरून वाहतो. तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्याच्या दाबामुळे नाल्यावरील पूल केव्हाही कोसळू शकतो. पावसाळ्यात या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असल्याने निमगाव येथे शिक्षण घेणारे शाळेकरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. तसेच या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत असे. नाल्यावरील जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

सदर बाब अरविंद कात्रटवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या मागणीची दखल घेऊन मोहटोला-निमगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम मंजूर करून ते पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वाहनधारक, शाळेकरी विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी समस्या दूर झाली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी नवीन पुलाचे बांधकाम मार्गी लावल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अरविंद कात्रटवार यांनी नुकतेच नवीन पुलाच्या बांधकामाला भेट देऊन आपल्या शेकडो शिवसैनिकांसह जल्लोष साजरा केला.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, प्रमोद आवारी, मंगल भरणे, संदिप हर्षे, तुषार बोरकर, निखील आवारी, प्रविण आवारी, दिपक कोसमशिले, रोशन आवारी, आदित्य भरणे, अजिंक्य नगराळे, साहिल कोसमशिले, राहुल सावरकर, विलास ढोलणे, मनोज मांडवकर, विनोद जांभुळकर, अमोल भैसारे, प्रकाश भैसारे, आनंदराव सोरते, लोमेश कुमरे, रामदास ठाकरे, उमेश चापले, पराग कुमरे, सौरभ कोलते, मोहित लाजुरकर, अमिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, गुणेश गुंटीवार, युजिन चौधरी, आरिफ ढवळे, रोशन कारेते, प्रेमानंद जनबंधु, साहिल कारेते, नयन कारेते, तन्मय झंझाळ, मधुकर बावणे, सचिन मडावी, पियुष सेलोटे, रंजित वलादे, अजय सेलोटे, देवेंद्र वलादे, आशिष शेडमाके, प्रकाश भजभुजे, अजीत समर्थ, अजय राऊत, तेजस समर्थ, विशाल बोरकर, साहिल बांबोळे, प्रज्वल बोरकर, सुमित डोंगरे, राजेंद्र मेश्राम, धनराज ठेंगे, मयुर मेश्राम, नवनाथ नरुले, आकाश कोडवते, जीवन उसेंडी, गणेश ठाकरे, मोरेश्वर वलादे, आशिष मुरतेली, अभिषेक करकाडे, विलास नैताम, स्वप्निल जुमनाके, विलास उंदिरवाडे, रमेश ढवळे, पुरुषोत्तम उंदिरवाडे, विलास भैसारे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button