गडचिरोलीविदर्भ

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर

गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल सोमवार, २३ जून २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सोमवार, २३ जून रोजी सकाळी ८.१५ वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे आगमन व राखीव. ·  सकाळी ८.४५ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, मुरखळा येथे आगमन आणि शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपस्थिती. दुपारी १.३० वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी २.३५ वाजता जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. ६ वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोयीनुसार रामटेककडे प्रयाण.

या दौऱ्यात सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल जिल्ह्याच्या विकासासंबंधी विविध बैठका घेणार असून, शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button