गोंदियाविदर्भ

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ ; ऐकोडी येथे जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात झाली. ऐकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव पार पडला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेने विशेष सजावट केली होती. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक रांगोळी, फुलं आणि गोडधोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ, टिळा आणि मिठाई देऊन करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेची आवड वाढवण्यासाठी प्रेरणा दिली.

शाळेतील शिक्षकांनी गावातून फेरी काढून विद्यार्थ्यांना शाळेच्या दिशेने मार्गस्थ केले, काही शाळांमध्ये पालकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाव्दारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सव आनंदमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या उपक्रमात रमणलाल ताजने, मंजू उईके, आशा हिरणखेडे यामिनी बनसोड, अरुण बिसेन, शालू चौधरी, अश्विनी पटले, अजबराव रीनायत यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button