गडचिरोलीविदर्भ

अवैध विक्रीचा विरोध दर्शवित गावाला केले दारूमुक्त

लक्ष्मीदेवपेठा येथे मुक्तीपथ व ग्रामस्थांची संयुक्त कृती

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवपेठा येथे अवैध दारूविक्री होत असल्याने ग्रामस्थांच्या जीवन शैलीवर विपरीत परिणाम झाले होते. महिलांना भांडण-तंट्याचा सामना करावा लागत होता. तेव्हा मुक्तीपथकडून मार्गदर्शन घेत महिलांनी आपल्या गावात दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली व दारूविक्रीमुक्त गाव म्हणून ओळख प्राप्त केली. आता मागील दोन वर्षांपासून गावात दारू विक्री बंद आहे.

गावात दोन दारूविक्रत्यांच्या माध्यमातून नियमित दारूविक्री होत असल्याने घरातील प्रमुख, युवक दारूच्या व्यसनाला लागले होते. मद्यपींमुळे घरात भांडणे होणे, महिलांना पतीकडून मारहाण होणे ही बाब नित्याचीच झाली होती. अशा वातावरणामुळे मुले सुद्धा शाळेत जात नव्हते. या समस्यांमुळे गावातील नागरिक व महिला त्रस्त झाल्या होत्या. एकेदिवशी मुक्तीपथ टीमने गावाला भेट दिली असता, महिलांनी आमच्या गावाला दारूच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने मुक्तीपथ टीमने गावात भेटीगाठी वाढवत दोन सघन भेट उपक्रम राबविला. गावात मुक्कामी राहून महिलांची संघटना स्थापन केली. या संघटनेला अवैध दरुविक्री विरोधात करावयाचा कृती आराखडा समजावून सांगितला. त्यानुसार गावातील महिलांनी वाटचाल सुरू केली.

गावात दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध दारूविक्री बंद करा अन्यथा पोलिसांच्या मार्फतीने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करीत दारूसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला. एवढेच नाही तर विक्रेत्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात आली. अशाप्रकारे मुक्तीपथ च्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थानी कृती करून आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केली. आता मागील दोन वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद असल्याने गावात शांतता निर्माण झाली असून महिलाना होणारा त्रास देखील कमी झालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button