
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री तथा गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपण, रुग्णांना अन्नदान आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचा समावेश होता.
वाढदिवसानिमित्त शहरातील पंचवटी नगर आणि सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डात ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेखाली वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी योगिताताई पिपरे आणि प्रमोद पिपरे यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यानंतर, जिल्हा महिला रुग्णालयात ‘माणुसकीचा घास’ या कार्यक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्यात आले, ज्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.

या सामाजिक उपक्रमांनंतर शासकीय विश्रामगृहात योगिता पिपरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात केक कापून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, चंदा कोडवते, माजी शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, विवेक बैस, प्रा. अरुण उराडे, देवाजी लाटकर, माजी नगरसेविका लता लाटकर, वैष्णवी नैताम, अलका पोहनकर, वर्षा कन्नाके, निता बैस, कोमल बारसागडे, अर्चना चन्नावार, गीता कुळमेथे, संघमित्रा खोब्रागडे, पूनम हेमके, दर्शिता प्रमोद पिपरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



