
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यांतर्गत अजब-गजब विचार मंच आणि आ. डॉ. मिलिंद नरोटे मित्रपरिवार यांचा उपक्रम
गडचिरोली : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांचा अनोखा नजराणा गडचिरोलीकर रसिकांसाठी सादर होणार आहे. अजब-गजब विचार मंच आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे मित्रपरिवार यांच्या वतीने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ‘रंग लोककलेचा’ हा सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. यात गोंधळ, वासुदेव, शेतकरी आणि आदिवासी नृत्य, भारुड, लावणी, कोळी गीत, धार्मिक नृत्य, देशभक्तीपर गीत नृत्य, तसेच महापुरुषांच्या जीवनगाथेचे नृत्यातून सादरीकरण यांचा समावेश आहे. हे सर्व सादरीकरण मुंबई येथील प्रख्यात कलावंत करणार असल्याने, प्रेक्षकांना उच्च दर्जाच्या कलाविष्काराचा अनुभव घेता येणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सुभाष धंदरे, दत्तू सुत्रपवार, चेतन गोरे, विश्राम होकम, प्रवीण खडसे, सचिन मून, मिलिंद उमरे आदींनी केले आहे.



