चंद्रपूरविदर्भ

‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ ठरले महावितरणच्या नाट्यस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटक!

चंद्रपूरच्या ‘रंगबावरी‘ने पटकावला दुसरा क्रमांक; अभिनेत्री रोहिणी ठाकरे सर्वोत्कृष्ट

चंद्रपूर : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ या नाटकाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला आहे. तर नागपूर प्रादेशिक विभागाच्या (चंद्रपूर परिमंडळ) ‘रंगबावरी’ या नाटकाने द्वितीय क्रमांकाचा मान मिळवत चंद्रपूरच्या नाट्यप्रेमींना अभिमानास्पद यश मिळवून दिले.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अभिनयाची आणि कलागुणांची उत्कृष्ट झलक दाखवली. ‘रंगबावरी’ नाटकाला द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाल्यामुळे चंद्रपूर परिमंडळाचे नाव राज्यभर गाजले. विशेष म्हणजे, या नाटकातील अभिनेत्री रोहिणी ठाकरे हिला सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, तर प्रशांत ठाकरे यांना रंगभूषा व वेशभूषेसाठी द्वितीय पारितोषिक मिळाले. नाटकाचे दिग्दर्शन करणाऱ्या संध्या चिवंडे यांनाही दिग्दर्शनासाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या नाट्यस्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले.

दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ६ ) सायंकाळी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु.) अरविंद भादीकर, मुख्य तपास अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंते हरिष गजबे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर, मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्यभरातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल

सर्वोत्कृष्ट नाटक: प्रथम – ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ (पुणे), द्वितीय – ‘रंगबावरी’ (चंद्रपूर) दिग्दर्शन: प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय – संध्या चिवंडे (चंद्रपूर) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: प्रथम – रोहिणी ठाकरे (चंद्रपूर), द्वितीय – भक्ति जोशी (पुणे) सर्वोत्कृष्ट अभिनेता: प्रथम – विजय जोशी (पुणे), द्वितीय – श्रावण कोळनुरकर (छत्रपती संभाजीनगर) रंगभूषा व वेशभूषा: प्रथम – विकास पुरी (पुणे), द्वितीय – प्रशांत ठाकरे (चंद्रपूर) नेपथ्य : प्रथम – सतीश सरोदे (पुणे), द्वितीय – राम मेस्त्री (कोकण) प्रकाशयोजना : प्रथम – अभय येरडे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय – अभिजीत सिकनिस (कोकण) संगीत : प्रथम – रुपेश देशमुख (नागपूर), द्वितीय – अनिल राजपूत  (छत्रपती संभाजीनगर) उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे), सायली सायनकर प्रादेशिक कार्यालय नागपूर (चंद्रपूर परिमंडळ) आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button