गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. मिलिंद नरोटे यांची जिल्हा प्रक्षेत्र कार्यालयाला भेट

बांधकाम कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा ; ऑगस्टअखेर काम पूर्ण करण्याचे निर्देश

गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हा प्रक्षेत्र कार्यालयाच्या बांधकाम कामांची प्रगती तपासण्यासाठी पुन्हा एकदा भेट दिली. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन सुरू असलेल्या दोन्ही नवीन इमारतींच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान आमदार डॉ. नरोटे यांनी कामाचा वेग, गुणवत्ता आणि आवश्यक साहित्याची उपलब्धता यांसारख्या बाबींची माहिती घेतली. त्यांनी संबंधित कंत्राटदाराला ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कामाची गुणवत्ता राखण्यासही त्यांनी विशेष भर दिला.

या भेटीदरम्यान डॉ. नरोटे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा आणि परवानग्या तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगितले. जनतेच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही कामे लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अंकुश पवार, क्रीडा मार्गदर्शक एस. बी. बडकेलवार, सा.बां. विभागाचे डोंगे, रूपाली काळे आणि इतर सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button