गडचिरोलीविदर्भ

​अल्ट्राव्हिजन एक्स-रे व सोनोग्राफी क्लिनिकचे अत्याधुनिक सेवांसह स्थानांतरण

सीटी स्कॅन, ४डी सोनोग्राफी आणि डिजिटल एक्स-रे मशीनसारख्या सुविधा उपलब्ध

देसाईगंज : देसाईगंज शहरात ‘नाकाडे अल्ट्राव्हिजन एक्स-रे व सोनोग्राफी क्लिनिक’ च्या नवीन आणि अत्याधुनिक केंद्राचे स्थानांतरण व नूतनीकरण मोठ्या उत्साहात पार पडले. या क्लिनिकमध्ये आता सीटी स्कॅन, ४डी सोनोग्राफी आणि डी.आर. प्रणालीसह एच.एफ.एक्स रे मशीन यांसारख्या प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी डॉ. नाकाडे कुटुंबाचे कौतुक केले आणि देसाईगंजच्या नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. माजी आमदार कृष्णा गजबे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदासजी मसराम, मोती कुकरेजा, डॉ. ते. ना. बुध्दे, माजी न्यायाधीश ज्ञानदेवजी परशुरामकर, लक्ष्मण रामानी, संतोष शामदाशानी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विनोद नाकाडे, मालती नाकाडे, डॉ. मंगेश नाकाडे आणि डॉ. स्नेहल नाकाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे नवीन क्लिनिक आता विर्शी वार्ड, ब्रम्हपुरी-आमगांव बायपास रोड, देसाईगंज (वडसा) येथे स्थलांतरित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button