
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील गोमणी ग्रामपंचायत अंतर्गत मुखडी गावात मुक्तीपथच्या वतीने शक्तिपथ बैठक घेण्यात आली. यावेळी महिलाना आरोग्य व अवैध दारू बंद करण्यासाठी तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी मार्गदर्शन केले.
गावातील लोकांनी मलेरिया होऊ नये याकरिता काय करावे, मलेरियाचे लक्षणे, हा आजार कसा होतो या सर्व विषयांवर माहिती देण्यात आली. सोबतच मच्छरदाणीचा वापर कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. घर परिसरात पावसाचे पाणी जमा झाल्यास डासांची पैदास होऊन मलेरिया या आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने योग्य निवारण करावे. पाण्याच्या स्रोतांमध्ये गप्पी मासे पाळावे तसेच 15 वर्षावरीला युवती व महिलाना टॉनिकच्या गोळ्या वाटप करीत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू खर्राचे दुष्परिणाम समजावून सांगत आपल्या मुलांसह कुटुंबियांना कॅन्सर पासून कसे वाचवावे हे सांगण्यात आले. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या.
यावेळी सरपंच जिजाबाई मडावी, पोलिस पाटील शंकर मडावी, आशा स्वयंसेविका छाया मडावी, अंगणवाडी सेविका कविता मडावी, मनिषा मडावी, सुरेश मडावी, धर्मा वेलादी, जानकिराम सिडाम, ईश्वर मडावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



