क्राईमगोंदियाविदर्भ

अवैध दारूसह १७.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आमगाव पोलिसांची कारवाई   

आमगाव : गोपनीय माहितीच्या आधारावर आमगाव पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान पोलिसांना पाहून पळ काढत असलेल्या वाहनाचा पाठलाग करीत दारू तस्करी करणाऱ्याला पकडण्यात आले. या प्रकरणात २ लाख २३ हजार ४४० रुपये किंमतीच्या दारूसह एकूण १७ लाख २३ हजार ४४० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

पोळा सणानिमित्त एका वाहनाच्या माध्यमातून अवैधरित्या दारू वाहतूक केली जात आहे, अशी खात्रीशिर माहिती आमगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्त्या आधारावर आमगाव पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. २१ ऑगस्टला सायंकाळी सुमारास कार क्र. सीजी ०७/एएस. ८९३८ हे वाहन दिसून आले. दरम्यान पोलिसांनी सदर वाहनला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांना पाहून पळ काढला. यावर पोलिसांना वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरावर वाहनाला पकडण्यात आले. वाहनाची चौकशी करण्यात आली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू वाहून नेत असल्याचे समोर आले. या संदर्भात वाहन चालकास विचारणा केली असता, सदर दारूची वाहतूक अवैधरित्या होत असल्याचे दिसून आले. यामुळे २ लाख २३ हजार ४४० रुपयाची दारू व १५ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १७ लाख २३ हजार ४४० रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध आमगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोनि. तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात असीम मन्या, दुधराम मेश्राम, योगेश मुनेश्वर, चेतन शेंडे, भागवत कोळापे, नितीन चोपकर, विनोद उपराडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button