
चार आरोपी पसार
मोहाडी : मोहाडी तालुक्यातील पांजरा बोरी शेतशिवारात तासपत्तीवर जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत यांच्या नेतृत्त्वात पोलिस पथकाने २३ ऑगस्ट रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास छापेमार कारवाई केली. सापळा कारवाईत लाखाच्या मुद्देमालासह तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले, तर चार आरोपी पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये संदीप प्रल्हाद बडगे (३४, पांजरा-बोरी), वसीम बब्लू पठाण (४०, तिरोडा, जि. गोंदिया), परमानंद कान्हू सार्वे (३०, लावेश्वर, ता. भंडारा) यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून सुझुकी मोपेड (एमएच ३६ एपी २१६२), मोबाइल व नगदी रुपये असा १,३४,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पसार झालेल्यांयध्ये ईश्वर अजाबराव शेंडे (रा. पांजरा), सुधाकर बिनजोडे (४०, वडेगाव, ता. तिरोडा), अमित बागडे (३५, अर्जुनी, ता. तिरोडा), महेंद्र बर्वे (३५, करडी) यांचा समावेश आहे. याप्रकरणी करडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.



