नागपूरविदर्भ

झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

श्री गणेश उत्सवानिमित्त आरती

नागपूर : गोधनी येथील झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेतर्फे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संस्थेस भेट देवून श्री गणेशाचे पूजन करुन आरतीत सहभाग घेतला.

यावेळी आमदार परिणय फुके, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, संस्थेचे अध्यक्ष महेश साधवानी, विरेंद्र कुकरेजा, नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, तसेच घनशाम कुकरेला, जयप्रकाश गुप्ता, गिरीष साधवानी, असरानी, संस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, उपाध्यक्ष एस.ई. चौधरी आदी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संस्थेचे प्रमुख महेश साधवानी यांनी स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button