गडचिरोलीविदर्भ

एटापल्लीत खर्राविक्री बंदी, दारूविक्रीचे प्रमाणही अल्प 

मुक्तिपथ तालुका समितीचा पुढाकार 

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून ११० किलोमीटर अंतरावर व अतिदुर्गम भागात एटापल्ली आहे. या तालुक्यात अती तातडीच्या सोयी सुविधा नसून मोठ्या आजारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागाला व्यसनाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी मुक्तिपथ तालुका समिती सक्रिय आहे. विविध कृती कार्यक्रम राबवून एटापल्ली शहरातील खर्राविक्री बंदी करण्यात आली असून अवैध दारूविक्रीचे प्रमाणही अल्प आहे.

एटापल्ली तालुक्यातील १८१ गावात मुक्तिपथ चमूतर्फे गाव, ग्रामपंचायत समिती, शाळा इत्यादी ठिकाणी गाव संघटना, शहर संघटना स्थापन करून दारू, तंबाखू, गांजा अशा नशेली पदार्थ बंदीकरीता व्यापक जनजागृती सुरु आहे. तंबाखू खर्रा सेवनामुळे रक्ताची कमतरता, तोंडाचे आजार, तोंड कमी उघडणे, नामर्दपना, कॅन्सर पूर्व आजार शहरात व गावात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. काही गावात कॅन्सरने मृत्यू पण होत आहेत. यातून तालुक्याला मुक्त करण्यासाठी मुक्तिपथ तालुका समितीच्या पुढाकारातून विविध कृती कार्यक्रम राबविले जात आहेत.

एटापल्ली शहरातील सर्वच प्रकाराची अवैध दारू विक्री बंद करण्यात आली असून विद्यार्थी व आदिवासीच्या आरोग्य रक्षणासाठी शहरातील सुगंधित तंबाखु व तंबाखूयुक्त खर्रा विक्री बंदीची धडक मोहीम महसूल विभाग, पोलिस विभाग, नगरपंचायत विभाग व मुक्तीपथ चमूद्वारे राबविण्यात येत आहे. यामळे एटापल्ली शहरातील तीन महिन्यापासून अवैध दारू विक्री अल्प असून आता एक महिन्यापासून तंबाखुयुक्त खर्रा विक्री बंदी आहे. यामळे विद्यार्थी, काम करणारे मजूर, महिला यांची आर्थिक बचत होऊन आरोग्य सुधारणा होत आहे. एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे सहकार्याने दारू व खर्रा विक्री बंदीसाठी मुक्तिपथ तालुका समितीकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button