चंद्रपूरविदर्भ

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुल येथील घटना ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

मुल : येथील बाल विकास प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक विवेक विनोद हरमवार (४०) यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ९: ३० वाजता स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय झाली आहे.

शिक्षक विनोद हरमवार हे तालुक्यातील चांदली बुज येथील मूळ रहिवासी. काही वर्षापासून ते शहरातील बाल विकास प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. वॉर्ड क्रमांक १४ मध्ये त्यांचे स्वतःचे घर आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस होता. मात्र, ते शाळेत रुजू झाले नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी त्यांना फोन केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हरमवार यांच्या पत्नीला त्यांनी फोनवरून विचारणा केली. तेव्हा त्या माहेरी असल्याचे सांगितले. संपर्कच होत नसल्याने पत्नी व नातेवाइकांच्या मनात शंका निर्माण झाली. सकाळी पत्नी व नातेवाइकांनी मूल येथील घरी आले असता पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button